अभाविप च्या वर्धिनी युवती संमेलनाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Wed 30-Sep-2026,03:28 PM IST +05:30

ताजा खबरों से अपडेट रहने के लिए हमारे Whatsapp Channel को Join करें |

Follow Us

अभाविप च्या वर्धिनी युवती संमेलनाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद Wardha Yuvati Sammelan 2026
  • वर्ध्यात ‘वर्धिनी युवती संमेलन’ उत्साहात संपन्न झाले.​

  • ‘पंचपरिवर्तन’ सत्रातून युवतींना सामाजिक भूमिका आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन.​

  • मुलाखत सत्रात डॉ. उर्मिला क्षीरसागर यांच्याशी प्रेरणादायी संवाद साधण्यात आला.​

Maharashtra / Wardha :

Wardha / अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘वर्धिनी युवती संमेलन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकासासोबतच नेतृत्वगुणांना चालना देणे आणि समाज व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवतींचा सक्रिय सहभाग वाढविणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश होता. या संमेलनाला युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उद्घाटक मा. मीनाक्षी सहरावत उपस्थित होत्या. यावेळी प्रांत सहमंत्री रिदम शहा, स्वागत समिती अध्यक्ष ॲड. शितलताई भोयर, स्वागत समिती उपाध्यक्ष सौ. पूजाताई शाहू, स्वागत समिती सचिव डॉ. स्मिताताई तराळे तसेच कार्यक्रम प्रमुख प्रणाली रघाटटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर आयोजित ‘पंचपरिवर्तन’ भाषण सत्रात डॉ. सीमा पांढरकर यांनी युवतींची सामाजिक भूमिका, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि समाजपरिवर्तनातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. या सत्रात नगर सहमंत्री अपेक्षा वाकडे यांचीही उपस्थिती होती.

संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेल्या मुलाखत सत्रात डॉ. उर्मिला क्षीरसागर (माई) यांच्याशी गौरी मांदडे यांनी संवाद साधला. समाजकार्याचा प्रवास, युवतींसमोरील आव्हाने, आत्मविश्वास आणि सामाजिक योगदान या विविध विषयांवर प्रेरणादायी संवाद साधण्यात आला.

यावेळी प्रांत छात्रा प्रमुख आर्याताई पाचखेडे, विभाग संघटन मंत्री पीयूषजी ठावकर, विभाग छात्रा प्रमुख सायलीताई पिपरी, विभाग संयोजक अभिषेक द्विवेदी, जिल्हा संयोजक बादल लोखंडे, नगर मंत्री ओम शर्मा, आर्वी जिल्हा विद्यार्थी विस्तारक, वर्धा नगर विद्यार्थी विस्तारक राजेंद्र सहस्त्रबुद्धे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व व वर्तमान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ज्ञान, शील, एकता’ या विचारातून युवतींमध्ये आत्मविश्वास, संस्कार, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वाची भावना जागृत करण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.  युवतींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्धिनी युवती संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.